Vistaarnaari Kshitije… Unchaavanaaryaa Aashaa…
Kshitij Classes took the first step of a thousand-mile journey on 2nd January 2002 with nothing but a motto, ‘Vistaarnaari Kshitije… Unchaavanaaryaa Aashaa…’ (‘Expanding Horizons… Rising Aspirations…’), and a philosophy of an ‘IDEAL CLASS’!
We firmly believe that any student can achieve great success with determination, confidence and perseverance. This belief makes us assert ‘Enter as a student, Leave as a scholar’. And our students have been making our assertion a reality with their continued success.
In-depth explanation of every topic while making the syllabus interesting for the students, solving doubts; taking daily tests, weekly tests; assessing answer-sheets and explaining the mistakes committed, completing syllabus on time; taking revision tests on entire syllabus in last two months, assessing these papers and working on writing speed, time management, question-wise mark distribution. This is the recipe of our success.
No one can reach the horizon because it is, in reality, an illusion. When one tries to go up to the horizon, he realizes that it is still far away. Similarly, the horizon of education is limitless and ever-expanding. Like this expanding horizon, the hopes and aspirations of our students are also ever rising.
We understand the social, economic and educational background of Madhya Mumbai. That is why ‘quality education in reasonable fees’ is not just an advertising slogan for us… it is our principal obligation! Teaching is not just our occupation… it is our sacred duty!
Kshitij Classes २ जानेवारी, २००२ रोजी केवळ १५ विद्यार्थी आणि " विस्तारणारी क्षितिजे ... उंचावणाऱ्या आशा ... " ह्या घोषवाक्यासह एका आदर्श क्लासची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून क्षितिज क्लासेसची सुरुवात झाली.
जिद्द, आत्मविश्वास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल; तर सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा दैदिप्यमान यश मिळवता येतं ह्यावर आमचा दृढविश्वास आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो ... Enter as a student, Leave as a scholar ! आमचं हे म्हणणं आमच्या विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवलं आहे.
विद्यार्थांना सर्व विषयांचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे शिकवणे , न समजलेला भाग पुन्हा समजावून सांगणे , दररोज झालेल्या भागावर परीक्षा घेणे , दर आठवड्याला परीक्षा घेणे , उत्तरपत्रिका तपासून त्यातील चूका समजावून सांगणे , अभ्यासक्रम नियोजित वेळेत संपवणे, शेवटच्या दोन महिन्यात पूर्ण गुणांच्या सराव परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासून लिखाणाचा वेग , वेळेचे नियोजन , प्रश्न प्रकारानुसार लिहिण्यासाठी लागणारा वेळ , प्रश्नांनुसार गुणांची विभागणी इत्यादी गोष्टी समजावून सांगणे हे आमच्या यशाचे गमक आहे.
असं म्हणतात की , क्षितिजापर्यंत कोणालाही पोहचता येत नाही. कारण तो एक आभास असतो. तिथपर्यंत पोहोचल्यावर लक्षात येतं की , क्षितिज अजून दूर आहे. शिक्षणाचं क्षितिज हे देखील असचं दूर पर्यंत विस्तारलेलं आहे. ह्या विस्तारणाऱ्या क्षितिजासोबतच आमच्या व आमच्या विद्यार्थ्यांच्या आशा देखील दिवसेंदिवस उंचावत आहेत.
नायगाव विभागाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीशी आम्ही जवळून परिचित आहोत. सामाजिक बांधिलकी म्हणून माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण देणे हे आम्ही आमचं परमकर्तव्य मानतो.
शिकवणं हा आमचा व्यवसाय नाही, तो आमचा पवित्र धर्म आहे.